एटीएम कार्डची अदलाबदल; दीड लाख लांबविले

Foto
छत्रपती संभाजीनगर, भामट्यांनी (सांजवार्ता ब्युरो) एटीएममध्ये पैसे काढण्याची घाई करीत एका आशा वर्करच्या एटीएम कार्डची अदलाबदल केली. यानंतर दोन दिवसांत खरेदी आणि रोख असे सुमारे दीड लाख रुपये लांबविले. ही घटना मंगळवारी (दि.२१) सहकारनगर परिसरात घडली. जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
वनमाला दीपक गोसावी (वय ५६, रा. बाजीराव पेशवेनगर, सातारा परिसर) यांनी तक्रार दिली. त्या आशा वर्कर आहेत. मंगळवारी त्या सांयकाळी मुलीसह सहकारनगर चौकातील युनियन बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या. पैसे काढताना तेथे आलेल्या तिघांनी
तुम्हाला पैसे काढण्यासाठी वेळ लागतोय, आम्ही तुम्हाला पैसे काढून देतो असा सारखा तगादा लावला. तेव्हा त्यांनी १ हजार रुपये काढले. कार्ड काढताना एकाने हातचलाखीने कार्डची अदलाबदल केली. घाईघाईत गोसावी कार्ड घेऊन तेथून निघाल्या.
बुधवारी गेल्यावर पिन गोसावी या पुन्हा त्याच एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी टाकूनही व्यवहार होत नसल्याने त्यांनी कार्ड तपासले. तेव्हा ते आपले नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी गोसावी यांनी पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. या प्रकरणाचा अधिक तपास हवालदार संदीप जमधडे करीत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/